धक्कादायक: लग्नाच्या एक दिवसा आधिच नवऱ्यामुलाचा खून

0
430

भंडारा, दि. ६ (पीसीबी) – जिल्ह्यातील येरली गावातील विनोद कुंभरे या तरुणाचा धारदार हत्याराने पोटात वार करुन खून करण्यात आला. ही घटना आज (सोमवार) सकाळी गावाशेजारी असलेल्या जंगलात विनोदचा मृतदेह आढळल्याने समोर आली.

धक्कादायक म्हणजे मंगळवारी विनोदचे लग्न होते आणि आज खून झाल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. विनोदचा खून रात्रीच झाला असाव असा संशय व्यक्त केला जात आहे. भंडारा पोलीस तपास करत आहेत.