दि.२४(पीसीबी)-दक्षिण गोव्यातून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.या मुलाने २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवकांचे पुत्र सोहम नाईक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पुढील तपास सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून सोहम अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करून पीडित मुलींना धमकावण्यासाठी आणि गप्प राहण्यास भाग पाडण्यासाठी या व्हिडिओंचा तो वापर करत होता. गेल्या आठवड्यात एका पार्टीदरम्यान, आरोपीने कथितरित्या हे व्हिडिओ त्याच्या मित्रांना दाखवून आपल्या कृत्यांबद्दल सांगितले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आणि माध्यमांना आवाहन केले आहे की, पीडितांची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती प्रसारित करू नये आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा.सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पुढील काही दिवसांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








































