धक्कादायक: जगताप डेअरीजवळील झुडपात एक दिवसाच्या चिमुकलीला टाकून आई-बाप पसार

0
776

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – एक दिवसाच्या चिमुकलीला तिचे आई-वडिल जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरातील झुडपात फेकून पसार झाले. ही घटना बुधवारी (दि.२६) सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरातील झुडपात एका बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवली. यावर वाकड पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन  एक दिवसाच्या चिमुकलीला ताब्यात घेतले. तसेच तिला तातडीने औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वाकड पोलीस चिमुकलीच्या घरच्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून चिमुकली नकोशी असल्यानेच तिच्या आई-वडिलांनी तिला तेथे फेकून पळ काढल्याची चर्चा आहे.