तुझे डोके फोडेन; खासदाराची प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला धमकी

0
708

गुवाहाटी, दि. २७ (पीसीबी) – एआययुडीएफचे प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी एका  पत्रकाराला डोके फोडण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार गुवाहाटी येथील पत्रकार परिषदेत घडला आहे. यावेळी उपस्थित असलेल्या पक्षाच्या इतर नेत्यांनी अजमल यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र,  ते कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.  

पत्रकार  परिषदेत खासदार बदरुद्दीन अजमल यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. यावर त्यांचा तीळपापड  झाला. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच पत्रकाराच्या हातातील बूम फेकून दिला आणि त्याच्यावरच  धावून गेले. तसेच  त्याचे डोके फोडण्याची धमकीही  दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणासोबत आहात, अशा प्रश्न   अजमल यांना केला आसता त्यांना  राग अनावर झाला.

अजमल यांनी लगेचच आक्षेपार्ह शब्दांत पत्रकाराशी  वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना राग आल्याचे बघितल्यावर चिडलेल्या अवस्थेतच त्यांनी संबंधित पत्रकाराला तुझे डोके फोडेन, अशी धमकीच दिली. या प्रकारामुळे काहीवेळ  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  दरम्यान या प्रकरणी  पत्रकाराने पोलीस ठाण्यात अजमल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.