धक्कादायक: गंगा नदीच्या किनारीच महिलेवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ केला व्हायरल

0
774

पाटणा, दि. ४ (पीसीबी) – बिहार राज्यातील पाटणाजवळील गंगा नदीच्या किनारी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.३० सप्टेंबर) सकाळच्या सुमारास घडली. सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड आला.

पोलिसांनी याप्रकरणी व्हिडिओच्या आधारे दोन्ही नराधम आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पाटणा येथे राहणारी एक महिला गंगास्नानासाठी नदी किनारी गेली. महिला नदीत आंघोळीसाठी उतरली असता दोन नराधमांनी तिला गाठले. या नराधमांनी तिला फरफटत नदी किनारी आणले. यानंतर एकाने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱ्याने बलात्काराचे कॅमेऱ्यात चित्रीकरण केले. हा व्हिडिओ नराधमांनी सोशल मीडियावर देखील अपलोड केला. नराधमांनी धमकी दिल्याने पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने या व्हिडिओची दखल घेतली आणि पीडित महिलेचा शोध घेतला. या आधारे पोलिसांनी दोन्ही नराधमांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.