धक्कादायक; आजीने दोन वर्षाच्या नातीला सहाव्या मजल्यावरून फेकले

0
718

मुंबई, दि.१ (पीसीबी) – वारंवार दुसऱ्या नातवाशी भांडते म्हणून आजीने दोन वर्षाच्या नातीलाच सहाव्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  हि घटना मालाड पूर्व भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आजीला अटक केली आहे.

रूकसाना अन्सारी (वय ५०) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  “इजाज उबेदुल्ला अन्सारी यांचे कुटुंब काही दिवसांपूर्वी कुरार येथे राहण्यास आले होते. या ठिकाणी रुकसाना, तिचा पती, मुलगी, नातू यांच्यासह इजाज त्याची पत्नी आणि मुलगी जिया हे एकत्र राहत होते. शनिवारी पहाटे ५.३० ते ५.४५ या वेळेत जिया इमारतीखाली पडलेली काही नागरिकांनी पाहिले. ती मृतप्राय अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जिया हिला मृत घोषित केले आणि उंचावरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्प्ष्ट झाले,” दरम्यान, जियाचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून ती पडली नसल्याचा पोलिसांना संशय आला. “जियाचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आला, घरातील कुणीतरी केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील व्यक्तींची चौकशी केली असता, त्यातून जियाची आजी रुकसाना अन्सारी यांनीच तिला खिडकीतून फेकल्याची माहिती समोर आली. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास कुरार पोलिस करत आहेत.