शिवसेना-भाजपमध्ये अर्ध्या-अर्ध्या जागांचे वाटप मीडियाने केले – संजय राऊत  

0
813

पंढरपूर, दि. २४ (पीसीबी) – शिवसेना-भाजपमध्ये अर्ध्या-अर्ध्या जागांचे वाटप  मीडियाने केलेले आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने किंवा मुखपत्रातून आम्ही त्याबाबत काहीही जाहीर केलेले नाही,’ असे स्पष्ट करून  भाजपशी युती करण्यासाठी शिवसेना समान जागांची मागणी करणार असल्याचे वृत्त शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी फेटाळले.    

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (सोमवार)  पंढरपूरात चंद्रभागेच्या तिरी  महाआरती करणार आहेत. तसेच त्यानंतर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तर दुसरीकडे  शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, याबाबत शिवसेनेकडून  भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.   जागावाटपाचे फॉर्म्युलेही समोर आले आहेत.

मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे. शिवसेनेचे राज्य आणायचे आहे. यात चुकीचे काय आहे,’ असा प्रश्न राऊत यांनी  केला. युती होणार की नाही याबाबत बोलणे त्यांनी टाळले. उद्धव ठाकरे हे याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.