दोन दारूभट्ट्या, आठ दारू विक्रेत्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

0
260

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. ९) चाकण येथील दोन दारुभट्ट्यांवर तर पिंपरी, सांगवी, देहूरोड येथील तीन, निगडी येथील पाच दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

मोई गावात इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या दोन दारू भट्ट्यांवर चाकण पोलिसांनी छापा मारला. त्यातील पहिल्या कारवाईमध्ये नरबतसिंग राठोड (वय ४८, रा. फलके वस्ती, मोई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने गावठी दारू तयार करण्याची भट्टी लावली होती. पॉइलीसानी पाच हार लिटर रसायन, भट्टीचे साहित्य असा एकूण दोन लाख दोन हजार रुपये किमतीचा ऐवज नष्ट केला.

दुस-या कारवाईमध्ये प्रताप जयसिंग राठोड (वय ४२, रा. चिंबळीफाटा, कुरुळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुमारे तीन हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन, इतर साहित्य असा एकूण एक लाख २० हजारांचा मुद्देमाल नष्ठ केला आहे. राठोड यानेही मोई गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या काठावर दारूभट्टी सुरु केली होती.

पिंपरी पोलिसांनी अतुल चंद्रकांत भोरे (वय २९, रा.मिलिंदनगर, पिंपरी) याला अटक करून त्याच्याकडून नऊ लिटर गावठी दारू. इतर साहित्य असा ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सांगवी पोलिसांनी पद्माबाई शहाजी घोडके (वय ५५, रा. पिंपळे गुरव) या महिलेकडून ८१८ रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करत तिच्यावर गुन्हा दाखल केला. देहूरोड पोलिसांनी प्रेमसिंग शांताराम राठोड (वय ३०, रा. चव्हाणनगर, देहूगाव) याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बेकायदेशीरपणे बनवलेली पाच हजार १०५ रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली.

निगडी पोलिसांनी पाच दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. बाजीराव राजाराम धोत्रे (वय ६०, रा. ओटास्कीम, निगडी) याच्या कडून एक हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. अहंसाबाई भुवनेश्वर पाटील (वय ६३, रा. ओटास्कीम, निगडी) या महिलेकडून एक हजार रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.
महादेव साहेबराव साठे (वय ३०, रा. ओटास्की, निगडी) यांच्याकडून ४५० रुपये किमतीची, हनुमंत चंद्राम अष्टांगे (वय ३४, रा. ओटास्कीम, निगडी) यांच्याकडून ६६० रुपये किमतीची, राम साहेबराव साठे (वय ३०, रा. ओटास्कीम, निगडी) यांच्याकडून ३०० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. पाचही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.