कामाला निघालेल्या पत्नीवर चाकूने वार

0
181

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – कामाला निघालेल्या पत्नीला रस्त्यात गाठून तिच्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नीच्या गळ्याला आणि बोटाला गंभीर दुखापत झाली. ही घटना बुधवारी (दि. ९) सकाळी अकरा वाजता पिंपरी येथील जिजामाता हॉस्पिटलच्या गेटसमोर रस्त्यावर घडली.

मानसी ललित तलरेजा (वय २५, रा. काळेवाडी, मूळ रा. पिंपरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ललित ईश्वर तलरेजा (वय ४०, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. त्यांच्यात घरगुती कारणांवरून मागील काही दिवसांपासून भांडण सुरु आहार. फिर्यादी या पिंपरी येथील एका दुकानात काम करतात. बुधवारी सकाळी त्या कामावर जात होत्या.

पिंपरी मधील जिजामाता रुग्णालयाच्या समोर आल्यानंतर आरोपी पतीने फिर्यादी यांना रस्त्यात गाठले. त्याने फिर्यादी यांच्या गेल्यावर आणि हाताच्या बोटावर भाजी कंपन्यांच्या चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.