लेलँड ट्रकच्या वर्कशॉपमध्ये २२ हजारांची चोरी

0
232

पिंपरी, दि.१० (पीसीबी) ताथवडे येथील लेलँड ट्रकच्या वर्कशॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरून करून २२ हजार ५१६ रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत घडली.

रोहित राजेंद्र नाईक (वय ३४, रा. सातारा रोड, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी, दि. १० (पीसीबी) – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ताथवडे येथे लेलँड ट्रकचे वर्कशॉप आहे. २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या साहाय्याने वर्कशॉप उघडले. त्यातून २२ हजार ५१६ रुपये किमतीचे एक इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट (ईसीयु) हा स्पेअर पार्ट चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.