देहुरोड येथे सोन्याचे दोन बिस्कीटे देण्याचे आमिष दाखवून एकाला ३ लाखांचा गंडा

0
554

देहुरोड, दि. २८ (पीसीबी) – सोन्याचे दोन बिस्कीट देतो असे सांगून एकाकडून ५ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र सोन्याचे १०० ग्रॅम वजनी एक बिस्कट देऊन दुसरे बिस्कीट थोड्या वेळाने देतो असे सांगून ३ लाखांचा गंडा घातला. ही घटना (दि.१७ फेब्रुवारी २०१८) ते (दि.४ एप्रिल २०१८) या दरम्यान सेन्टोसा हॉटेल रावेत आणि तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब आकले (वय २७, रा. घोडेगाव, जुन्नरफाटा, ता. आंबेगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रकाश गोपाळ साळवे आणि त्याचा साथीदार संजय कार्ले (दोघेही. रा. यशवंतनगर, तळेगाव-दाभाडे) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र यांचा टायर पंचर काढण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी यापूर्वी आरोपी प्रकाश आणि संजय या दोघांसोबत सोन्याचे बिस्कीट खरेदीचा व्यवहार केला होता. बुधवारी (दि.१७ फेब्रुवारी २०१८) ते (दि.४ एप्रिल २०१८) या कालावधीत आरोपींनी राजेंद्र यांना ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून राजेंद्र यांना दोन सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून त्यांच्याकडून ५ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र सोन्याचे १०० ग्रॅम वजनी एक बिस्कट देऊन दुसरे बिस्कीट थोड्या वेळाने देतो असे आरोपींनी राजेंद्र यांना तब्बल ३ लाखांचा गंडा घातल आणि पसार झाले. बरेच दिवस उलटून देखील आरोपींनी राजेंद्र यांना सोन्याचे बिस्कट तर दिले नाहीच त्याचे पैसे देखील परत केले नाही. याप्रकरणी  प्रकाश आणि संजय या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.