मलायका अरोरा – अर्जुन कपूरच्या लग्नाची तारीख ठरली

0
481

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – बॉलिवूडचे एक हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. पुढच्याच महिन्यात मलायकाअर्जुन विवाहबंधनात अडकणार आहेत. १९ एप्रिलच्या मुहूर्तावर मलायकाअर्जुन लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती दिली आहे. ख्रिश्चन पद्धतीने मलायकाअर्जुन विवाहाच्या आणाभाका घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

मलायकाअर्जुनच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर वाच्यता अद्याप केलेली नाही. दोघे हातात हात घालून एकमेकांसोबत फिरताना अनेक वेळा दिसल्यामुळे अर्जुनमलायका डेटिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

मलायका आणि अर्जुन यांच्या वयामध्ये तब्बल बारा वर्षांचे अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा बारा वर्षांनी मोठी आहे. ती ४५ वर्षांची आहे, तर अर्जुन अवघ्या ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे दोघांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

दरम्यान, लग्नाला मलायकाच्या मैत्रिणीअभिनेत्री करीना कपूर खान, करिष्मा कपूर आणि त्यांची वांद्र्यात राहणाऱ्या मैत्रिणींची गँग उपस्थित राहण्याची चिन्हे आहेत. रणवीरदीपिकालाही लग्नाचे निमंत्रण असल्याची माहिती आहे.