देहुरोडमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाला जबर मारहाण

0
583

देहुरोड, दि. ३० (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तसेच मागून हॉर्न वाजवल्याने तिघांनी मिळून एकाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन बरगडीला गंभीर दुखापत केली. ही घटना देहुरोड येथील चेसुसीलेस्टील सोसायटी येथे घडली.

जरनेल सिंग धरमसिंग बोपाराया (वय ३९, रा. ट्रान्सपोर्ट सिलेस्टील सीटी फेज १, रावेत) असे बरगडीला मार लागून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, उमेश अग्रवाल, अमीत अग्रवाल आणि त्यांच्या एक अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.२४) रोजी फिर्यादी जरनेल सिंग हे त्यांच्या गाडीने चालले होते. यावेळी आरोपींची गाडी त्यांच्या गाडीच्या पुढे होती. यामुले जरनेल यांनी त्यांना हॉर्न दिला. यामुळे रागावलेल्या आरोपींनी जरनेल यांना पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन तसेच हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन त्यांच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत केली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.