गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाचे दावेदार; जळगावात अभिनंदनाचे लागले बॅनर

0
328

जळगाव, दि. ३० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. मोदींच्या विश्वासातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांचे विश्वासू जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवत आहेत. किंबहुना, आता एकनाथ खडसेंपाठोपाठ मंत्री महाजन जळगावात बॅनरवर मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत.