“देव तरी त्याला कोण मारी”; वार्षिक सहलीसाठी गेलेली बस पसरणी घाटात उलटली आणि…

0
248

सातारा, दि.०१ (पीसीबी) : पसरणी घाटामध्ये चालकाच्या प्रसंगावधनामुळे सुदैवाने एक दुर्दैवी घटना टळली. बसला अपघात झाल्याने ज्यामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. कंपनीची वार्षिक सहल करुन घरी परत जात असताना बस उलटल्याने हा अपघात झाला. ही घटना अपघात महाबळेश्वर येथील पसरणी घाटात घडली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे नववर्षांच्या पूर्व संध्येला सुदैवाने ही मोठी दुर्घटना टळली. घटनेतील जखमी झालेले सर्व जण चाकण, पुणे येथील एका कंपनीतील कामगार आहेत.

चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड महाबळेश्वरला खाजगी बसने चालले होते. या बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते. 31 डिसेंबरला सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला असताना पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवल पालखी रस्त्यावर अवघड वळणावर उतारावर अचानक बसचे ब्रेक फेल झाले.त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे खाजगी बस क्रमांक (एमएच 14, सीडब्लू 4764) रस्त्यावरच उलटली. वळणावरील असलेल्या चरीत चाक गेल्याने बसला अपघात झाला आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवितहानी घडली असती.

या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तातडीने जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.