देवदर्शनासाठी गेला, तरी देव बोलणार नाही, कारण बोलणारा देव मीच; डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचे वादग्रस्त विधान

0
781

सोलापूर, दि. १ (पीसीबी) – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार  डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी वादग्रस्त विधान केले आहे. १५ ते १९ एप्रिल या दरम्यान सुट्टी आहे. या सुट्टीत तुम्ही सहलीला किंवा देवदर्शनाला गेला, तरीसुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही.  देवदर्शनासाठी गेलात तरी देव बोलणार नाही.  कारण बोलणारा देव मीच आहे, असे विधान त्यांनी केले आहे.   

१५ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत कोणीही सहलीला किंवा देवदर्शनासाठी जाऊ नये. देवदर्शनासाठी गेला, तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही.  तुम्हाला समाधान मिळणार नाही. तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला तरी देव भेटणारही नाही आणि बोलणारही नाही. कारण बोलणारा देव मीच आहे, असे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी म्हटले आहे.   मतदान हे पवित्र काम आहे. मताचे दान टाकून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे ते म्हणाले.

दरम्यान,  सोलापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.  जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी  एका प्रचारसभेत भाषण करून वादग्रस्त विधान केले. यामुळे  जयसिद्धेश्वर शिवाचार्य  वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.