दुकानाच्या काउंटरची तोडफोड करत दुकानदाराला मारहाण

0
231

रहाटणी, दि. २३ (पीसीबी) – दुकानाच्या काउंटरची कोयत्याने तोडफोड करून दुकानदाराला मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी साडेतीन वाजता छत्रपती चौक, रहाटणी येथे अजय मोबाईल शॉपी या दुकानात घडली.

अजय राजवीर शर्मा (वय 20, रा. काळेवाडी) असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांचे छत्रपती चौक, रहाटणी येथे अजय मोबाईल शॉपी हे दुकान आहे. सोमवारी दुपारी आरोपी शर्मा यांच्या दुकानात आले. आरोपींनी दुकानाच्या काउंटरच्या काचेवर कोयता मारून काच फोडली. त्यानंतर शर्मा यांना शिवीगाळ केली. दुस-या आरोपीने दुकानाच्या समोरील रोडवरील सिमेंटच्या ब्लॉकने मारले. त्यात शर्मा यांच्या डोळ्याच्या आणि कानाच्या मध्यभागी दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी दुकानातून पळून जात असताना कोयत्याने हातावर मारून शर्मा यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.