अन्न व औषध प्रशासन विभागाची पिंपरी-चिंचवडच्या ‘या’ भागात मोठी कारवाई; एवढ्या रकमेचा गुटखा केला जप्त

0
639

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – अन्न व औषध प्रशासन विभागाने अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, चिंचवड येथे कारवाई केली. त्यात 36 हजार 720 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

रमेश धालूमल देवानी (वय 35, रा. संजय गांधीनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी खेमा लक्ष्मण कांबळे (वय 43) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश देवानी हा प्रतिबंधित गुटखा विकत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या मदतीने अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, चिंचवड येथे शनी मंदिराजवळील फूटपाथवर एका टपरीमध्ये कारवाई केली. त्यामध्ये विमल पान मसाला केसर युक्त, व्ही – 1 टोबॅको, एम सेंटेड टोबॅको असा वेगवेगळ्या कंपन्यांच्या पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळून आला. एकूण 36 हजार 720 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हा गुटखा आरोपीने विक्रीसाठी ठेवला असल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.