दारू प्यायला पैसे न दिल्याने व्यावसायिकाला मारहाण करत दुकान फोडण्याची धमकी

0
261

काळेवाडी, दि. ४ (पीसीबी) – दारू प्यायला पैसे न दिल्याने एका व्यक्तीने व्यावसायिकाला त्याचे दुकान फोडण्याची धमकी देत शिवीगाळ केली. ही घटना 30 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजता काळेवाडी येथे घडली

सचिन काकासाहेब पिंपरीकर (वय 42, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदेश उर्फ शिल्प्या चोपडे (रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या परिसरात राहणारा आरोपी संदेश याने फिर्यादी यांच्याकडे दारू पिण्यासाठी 500 रुपये मागितले. ते पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच दुकान फोडण्याची धमकी दिली. आरोपी हा साथीदारांच्या मदतीने परिसरात दहशत निर्माण करून व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करीत आहे. यापूर्वी फिर्यादी यांनी हप्ता म्हणून आरोपीला रोखीने व एकदा गुगल पे द्वारे 500 रुपये दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत