दापोडीत चिडवाचिडवी वरुन दोघा भावांनी एका अल्पवयीन मुलाला केली दगडाने मारहाण

0
720

दापोडी, दि. ९ (पीसीबी) – एकमेकांना चिडवल्यावरुन दोघा भावांनी मिळून एका १२ वर्षी अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या तोंडावर दगड मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दापोडी येथील मरिआई माता मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी जखमी मुलाच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धरम सुग्रीव झेंडे आणि त्यांचा भाऊ धीरज सुग्रीव झेंडे (दोघे रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी धरम आणि धीरज हे १२ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत खेळत होते. खेळता खेळता ते एकमेकांना चिडवून लागले. यामुळे त्यांच्यात भांडण लागले. यावर धरम आणि धीरज या दोघा भावांनी अल्पवयीनाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या तोंडावर दगड मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी धरम आणि धीरज या दोघां विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप दोघांनाही अटक करण्यात आलेली नाही. फौजदार बुढे अधिक तपास करत आहेत.