दापोडीत आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

0
640

दापोडी, दि. १३ (पीसीबी) – आजारपणाला कंटाळून एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. १२) दुपारच्या सुमारास दापोडी येथे घडली.

भैरवी गणपतराम चौधरी (वय ४७, रा. दापोडी. मूळगाव राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवी काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मुलगा घरी आला. मी हात-पाय धुवून येते, असे भैरवी यांनी मुलाला सांगितले. यामुळे मुलगा दुचाकीवर वाट पाहात थांबला होता. १५ मिनीट होऊन देखील आई न आल्याने तो तिला बोलविण्यासाठी घरात गेला. त्यावेळी भैरवी यांनी घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने त्यांना तातकाळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.