दापोडीतील “त्या” चिमुकलीवर अत्याचार करुन खून करणाऱ्या संशयित आरोपीची आत्महत्या

0
1070

दापोडी, दि. २२ (पीसीबी) – घरात एकटी असताना एका सात वर्षीय चिमुकलीवर अज्ञाताने बलात्कार करुन खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी दापोडीतून समोर आली होती.

या घटनेतील संशयित आरोपीने दापोडीतील एका झुडपात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

विजय बहादूर यादव (वय २५) असे त्याचे नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेशातला आहे

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी दापोडीतील एका सात वर्षांच्या मुलीवर घरात घुसून अज्ञाताने अत्याचार करुन खून केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलीस जलद गतीने आरोपीचा शोध घेत होते. मात्र या घटनेतील संशयीत आरोपी विजय दापोडीतील एका जंगलातील झुडपात गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.