दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद औटघटकेचा; पानशेत सांडव्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

0
474

पानशेत, दि. १० (पीसीबी) – दहावीच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याच्या आनंद व्यक्त करण्यासाठी कुटुंबीयांसोबत पानशेत धरण परिसरात फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा सांडव्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.९) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

तनेश अरुण आटपाळकर (वय १६, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी पानशेत पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनेश हा दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. यामुळे रविवारी दुपारी तो आईबाबा आणि अन्य कुटुंबीयांसह पानशेतला फिरायला गेला होता. खेळता खेळता तनेश धरणक्षेत्रातील सांडव्यात उतरला. आणि खोलीचा अंदाज न आल्याने बुडू लागला हे पाहताच त्याला त्याच्या चुलत्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने तनेश काही क्षणात बेपत्ता झाला. यामुळे आई, वडील, नातेवाईक दु:खावेगाने ओरडू लागले. तनेशला शोधण्यासाठी पानशेत धरणातून सांडव्याचे पाणी बंद करण्यात आले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तनेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.