दहशतवादावर चर्चा करण्यास तयार; इम्रान खानचे भारतासमोर लोटांगण

0
630

इस्लामाबाद, दि. २७ (पीसीबी) – पुलवामामध्ये जी दु:खद घटना घडली, तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भारतासमोर लोटांगण घालणारी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केली आहे.

पाकिस्तानमध्ये झालेल्या  बैठकीनंतर इम्रान यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. पुलवामामध्ये भारताचे ४१ जवान  दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत जैश ए मोहम्मदच्या ३५० दहशतवाद्यांना ठार केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पुलवामा प्रकरणाची चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत इम्रान खान यांनी   भारतासमोर  गुडघे टाकल्याचे दिसत आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानने आसरा देऊ नये,  असे सांगत अमेरिका व चीननेही भारताच्या बाजुने मत व्यक्त  केले आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे.