दबंग फॅन! ‘भारत’पाहायला चाहत्याने बूक केले संपूर्ण थिएटर

0
375

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – अभिनेता सलमान खानचे जगभरात फॅन्स आहेत. आपल्या लाडक्या ‘भाईजान’साठी हे फॅन्स काय करतील याचा नेम नाही. असाच काहीसा किस्सा ‘दबंग खान’च्या एका फॅननं केलाय. या पठ्ठ्यानं सलमानच्या आगामी भारत चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बूक केले आहे.

सलमान आणि कटरिना यांची मुख्य भूमिका असलेला भारत येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळावा यासाठी नाशिकच्या आशिष सिंघल या फॅनने हा पराक्रम केलाय. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा चित्रपट मोठ्या पडद्यावर शांतपणे पाहता यावा यासाठी त्याने संपूर्ण थिएटरच बूक केले आहे.

‘भारत’ पहिल्या दिवशी पाहता यावा यासाठी थिएटर्सच्याबाहेर तिकीट बूक करायला सलमान फॅन्सच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. केवळ नाशिकमध्येच नाही तर मुंबईतही सलमानच्या एका फॅनने भारतच्या फर्स्ट डे फर्स्ट शोची तब्बल १५० तिकिट एकट्याने विकत घेतली आहेत. तर, नेपाळमधील एका फॅनने मॉलमध्ये संपूर्ण थिएटर बूक केले आहे.