थेरगावात खुनी हल्ला झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक तिघे फरार

0
667

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – मित्राच्या आईला दुचाकीवरुन घरी घेऊन निघालेल्या बाबासाहेब उर्फ मयुर महादेव वडमारे (वय ३४, रा. ११५, १७/२स कैलासनगर, थेरगाव) या तरुणावर सोमवार (दि.१५ जुलै) रात्री साडेबाराच्या सुमारास सात जणांच्या टोळक्यांनी कोयता आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी मयुर याचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी अनिकेत रुपसिंग भाट (वय २१, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव), राहुल उर्फ सुधीर शहादेव झेंडे (वय २२, रा. जयमल्हारनगर, कॉलनी क्र.१, म्हसोबा मंदिराजवळ, थेरगाव), मेहबुब दस्तगीर पटेल (वय २२, रा. जयमल्हारनगर, कॉलनी क्र.१) आणि विश्वकर्मा नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तर युवराज अशोक शिंदे (रा. गुरुनानकनगर कॉलनी क्र.३, थेरगाव), स्वप्निल सगर उर्फ येडके (रा. थेरगाव) आणि ऋतीक उर्फ रुषभ रमेश मिश्रा (रा. थेरगाव) हे तिघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी बाबासाहेब उर्फ मयुर याचे अनिकेत भाटसोबत भांडण झाले होते. यामुळे त्याने त्याच्या इतर सहा साथीदारांना त्याला मारण्यास सांगितले होते. यावर सर्व आरोपींनी मिळून सोमवार (दि.१५ जुलै) रात्री साडेबाराच्या सुमारास मित्राच्या आईला दुचाकीवरुन घेऊन निघालेल्या मयुर याच्यावर कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने डोक्यात पायांवर आणि हातांवर जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. मयुर याला तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आरोपींवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल कऱम्यात आला होता. मात्र रविवारी (दि.२१) मयुर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अनिकेत, राहुल उर्फ सुधीर, मेहबुब पटेल आणि विश्वकर्मा नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्यांनी अनिकेत याच्या सांगण्यावरुन हा खून केल्याचे कबुल केले आहे. तर त्यांचे इतर तिघे साथीदार युवराज, स्वप्निल आणि ऋतीक हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक एच.व्ही.माने तपास करत आहेत.