त्या १४ जागा सांगा कुठल्या हव्यात, शिवसेनेची भाजपला विचारणा

0
629

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – २८८ मतदारसंघ दोघांनीही समसमान लढावे, हे गृहित धरत भाजपला हव्या असलेल्या १४ ते १८ मतदारसंघांची यादी पाठवावी. या जागा कळल्या तर वाटप सोपे होईल असे शिवसेनेकडून भाजपला कळवण्यात आले आहे. समसमान सत्ता या सुत्राचा आवलंब करत जागा वाटप चर्चेला प्रारंभ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्चित केला. असे वृत्त सध्या माध्यमात फिरत आहे.

सध्या भाजपचे १२३ तर सेनेचे ६३ आमदार आहेत. मित्रपक्षांनी निवडून येण्याची शाश्वती एकदोन ठिकाणीच असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे सेनेचे मत आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची संख्या धरून त्यांना किती मतदारसंघ हवेत याबाबत सेनेला माहिती हवी आहे.

दरम्यान पुणे, नागपूर या नागरी पट्टयात भाजपने सर्व जागा जिंकल्या असून सेनेची ताकद त्या ठिकाणी कमी आहे. त्या मागायच्या नाहीत. तर नाशिकमध्ये भाजपवर नाराज असलेले आमदार व ठाणे शहर या जागा मागण्याचाही सेनेचा विचार आहे.

भाजपने या सुचनेवर विचार सुरू केला असून आपल्याला हवे असलेले मतदारसंघ कोणते यावर काल रात्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी विचार केला आहे. आज शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे.