ऋषी कपूर यांचा लहानपणीचा फोटो शेअर करुन नीतू कपूरची फेस अॅपवर टीका

0
582

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – सध्या सोशल मीडियावर फेस अॅपची क्रेझ पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये तर या अॅपने धूमाकूळ घातला आहे. आता अभिनेत्री नीतू कपूर यांच्यावरदेखील या अॅपने जादू केली आहे. नुकताच त्यांनी पती ऋषी कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋषी कपूर अत्यंत क्यूट दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नीतू यांनी हा शेअर करत फेस अॅपवर टीका केली आहे.

नुकताच नीतू यांनी ऋषी कपूरच्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘फेस अॅप हे लोकांच्या चेहऱ्यात खूप जास्त बदल करुन दाखवत असल्याचा हा पूरावा आहे’ असे त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या या कॅप्शनची सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

या फेस अॅपचे क्रेझ सध्या सर्वांनाच लागले आहे. अभिनेत्री सोनम कपूर, दीपिका आणि रणवीर, वरुण धवन, अर्जुन कपूर यांनी ते ६० वर्षांचे झाल्यावर कसे दिसणार याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.