पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीत ‘या’ ९ सदस्यांची निवड

0
609

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीत नुतन ९ सदस्यांची निवड आज (गुरूवार) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या ५, राष्ट्रवादीच्या ३ आणि शिवसेनेच्या १ सदस्यांची नांवे महापौर राहुल जाधव यांनी जाहीर केली.

शिक्षण समितीत भाजपच्या चंदा लोखंडे, सागर गवळी, मनिषा पवार, शशिकांत कदम, निर्मला गायकवाड, राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, भाऊसाहेब भोईर यांची तर  शिवसेनेच्या रेखा दर्शिले यांची निवड करण्यात आली.

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यांचा  एक वर्षाचा कार्यकाळ  ८ जुलैरोजी संपला आहे. त्यानुसार रिक्त झालेल्या जागी नुतन सदस्यांची निवड करण्यात आली. सत्तारूढ नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या सदस्यांची नांवे असलेले बंद पाकीट महापौर राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर महापौरांनी सदस्यांची नांवे जाहीर केली.

दरम्यान, शहर सुधारणा समितीच्या सद्स्या आशा धायगुडे- शेंडगे आणि शिवसेनेच्या रेखा दर्शिले यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर भाजपच्या शर्मिला बाबर तर शिवसेनेचे सचिन भोसले यांची निवड करण्यात आली.