‘त्या’ मुलीची जात कोणती ? जीव वाचविणाऱ्या लेशपालला इंस्टाग्रामवर मेसेज

0
184

पुणे,दि.२८(पीसीबी) – सदाशिव पेठेत मंगळवारी २७ जून रोजी एका विद्यार्थिनीवर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र वेळीच तेथील तरुणांनी प्रसंगवधान दाखवत त्या मुलीचे प्राण वाचवले. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील असे या दोन तरुणांचे नाव आहे. सध्या राज्यभरातून या दोघांचे कौतुक केले जात आहे. अशात लेशपालने आपल्या सोशल मीडियावर ठेवलेला स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी लेशपालला सोशल मीडियावरील एका युजरने त्या मुलीची जात कोणती होती असं विचारल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच एमपीएससी परिक्षेत राज्यात सहावी आलेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्या झाली. ही घटना ताजी असतानाच काल घडलेल्या घटनेने पुणे हादरले.लेशपालने धाडस करत त्या कोयताधाऱ्याच्या तावडीतून मुलीला वाचवलं त्यानंतर लेशपालचे अनेकांनी कौतुक देखील केले. त्यानंतर लेशपाललाने आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यावरून लेशपालला काहींनी सोशल मीडियावर त्या मुलीची आणि मुलाची जात विचारल्याचे समजते.

यानंतर लेशपालाने असे प्रश्न विचरणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो,”“त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला डीएम करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला.”

काय घडलं नेमकं त्यावेळी –
आरोपी शंतनु जाधव तरुणीवर कोयत्याने वार करत असतानाच लेशपालने त्याला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर मागून आलेल्या हर्षद पाटील याने आरोपीच्या हातातील कोयता खेचून घेतला. त्यांच्या मदतीला सतीश नेहूल आणि इतर विद्यार्थी धावले. काही नागरिक आणि तरुणांनीही धाव घेत शंतनूला मिळेल त्या वस्तूने मारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शंतनूला घेराव घालून वाचवले. त्याला पकडून शेजारील पेरुगेट पोलीस चौकीत नेले.