…त्यामुळे ब्रिस्बेन कसोटी आयोजनातील अडचणी वाढल्या

0
402

सिडनी,दि.०९(पीसीबी) – ब्रिस्बेनमध्ये नव्याने तीन दिवसाचे लॉक डाऊन जाहिर केले आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तेथे होणाऱ्या चौथ्या कसोटीचे आयोजन अडचणीत आले आहे.

विलगीकरणाच्या अटी शिथिल केल्या नाहीत, तर भारतीय खेळाडू ब्रिस्बेनला खेळणार नाहीत अशी भूमिका बीसीसीआयने घेतली असून, त्याला चोविस तास होत नाहीत तोच ही लाॉक डाऊनची घोषणा झाल्यामुळे चौथ्या कसोटी समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. केवळ कोविडच नाही, तर ब्रिटनमधून येणाऱ्या नव्या स्ट्रेनच्या धोक्यामुळे एकूणच ऑस्ट्रेलियातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी ब्रिस्बेनवरच घेण्यात आग्रही आहे. त्यासाठी त्यांनी प्रेक्षकसंख्या देखिल कमी करण्याची तयारी दर्शविली आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीचा आयोजनात अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्ती सिडनीतील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.