भाजपच्या बड्या नेत्याला आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

0
340

मुंबई,दि.०९(पीसीबी) – शिवसेना नेत्यांच्या मागे ईडी चे शुल्ककाष्ठ लागल्यानंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनतर आता प्रसाद लाड यांची चौकशी होणार आहे.

प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 2014 साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून प्रसाद लाड ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांचे एक विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला आहे.