त्याने विचारही केला नव्हता कि असे काही घडेल. रात्री तो बाहेर पडला आणि…

0
324

चाकण, दि.२३ (पीसीबी) – चाकूचा धाक दाखवून तरुणाचा आयफोन आणि पाकीट असा एकूण 40 हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री आळंदी-चाकण रोडवर घडली.

आकाश सोनबा साठे (वय 23, रा. चाकण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साठे रविवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास आळंदी-चाकण रोडने जात होते. ते रोटाई तळ्याजवळ आले असता तीन चोरटे तिथे आले. चोरट्यांनी साठे यांना चाकूचा धाक दाखवला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साठे यांच्याकडील आयफोन व पाकीट त्यातील कागदपत्रे असा एकूण 40 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.