तृतीयपंथियावर अनैसर्गीक अत्याचार करुन उकळले सात लाख रुपये

0
469

नांदेड, दि. २४ (पीसीबी) – तृतीयपंथियावर वर्षभर अनैसर्गीक अत्याचार करुन त्याच्याकडून सात लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड येथे घडली.

याप्रकरणी पिडित तृतीयपंथिने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२२) गुन्हा दाखल केला. त्यानुसार, फैसल मोईज सिद्दीकी नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहराच्या नई आबादी परिसरात राहणारा फैसल मोईज सिद्दीकी याने एका तृतीयपंथियाशी ओळख पाडली. यातून ते घनीष्ठ मित्र झाले. जन्मभर सुखात ठेवीन असे आमिष फैसल याने तृतीयपंथीयाला दाखविले. त्याच्याकडून व्यापार करण्यासाठी रोख सात लाख रुपये उकळले. मागील एक वर्षापासून त्याच्याशी तो अनैसर्गीक अत्याचार करत होता. अखेर दिलेले सात लाख रुपये परत करीत नसल्याने तृतीयपंथियावर उपासमारीची वेळ आली. शेवटी त्याने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. यावरून अनैसर्गीक अत्याचार, फसवणुक, विश्वासघात यासह आदी कलमान्वये फैसल मोईजविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार होळकर तपास करत आहेत.