तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है – सुधीर मुनगंटीवार

0
436

चंद्रपूर,दि.३(पीसीबी) – शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक राजकीय प्रश्नांवर उत्तर दिली. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही मुलाखत भाजप-सेनेतील स्नेह दर्शविणारी आहे. शिवसेना-भाजपचा एकमेकांविषयीचा स्नेह आजही कायम आहे,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.“पण जर ही मुलाखत आपण पूर्ण पाहिली, पूर्ण वाचली तर या मुलाखतीचा सारांश एका चित्रपटाच्या गाण्याप्रमाणे सांगता येईल. “तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है” पण यात फक्त एकच बदल केला पाहिजे की, “तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है,” असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द शेवटी मी दिला नव्हता. शब्द ज्याने कोणी दिला असेल त्याला याबाबतची जास्त माहिती असेल, त्यावर तो व्यक्ती सांगू शकेल. पण जर शब्द दिला असेल तर तो पूर्ण झाला पाहिजे आणि जर शब्द दिला नसेल तर शब्द दिला असे सांगण्यात येऊ नये.

दरम्यान, भाजपबद्दल कदाचित शब्दाचे पालन केलं नाही म्हणून तुमच्या मनात राग असेल पण तो राग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर व्यक्त करु नका,” असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.