”तू कोण रे? इथे का बसलास?’ असं विचारत तरुणवार विळ्याने वार”

0
311

काळेवाडी, दि. १३ (पीसीबी) – मित्राच्या घराबाहेर बसलेल्या तरुणवार विळ्याने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री नढेनगर काळेवाडी येथे घडली.

रवींद्र शहाजीराव गायकवाड (वय 36, रा. भारतमाता चौक, काळेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रभाकर प्रल्हाद वाघमारे (रा. नढेनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी गायकवाड हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी नढेनगर, काळेवाडी येथे गेले होते. मात्र मित्र गावी गेल्याने काहीवेळ ते मित्राच्या घराबाहेर बसले. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी याने ‘तू कोण रे? इथे का बसलास?’ अशी विचारणा करीत शिवीगळ केली. त्यानंतर विळ्याने गायकवाड यांच्यावर वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.