माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
280

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 ते 5 मे 2021 या कालावधीत चिंचवड आणि यवतमाळ येथे घडली.

शिवंक सुषाष राठोड (वय 28), सुभाष लक्ष्मण राठोड आणि महिला आरोपी (सर्व रा. श्रीधरनगर, चिंचवड. मूळगाव मु. पो. शिवणी, ता. घाटंजी जि. यवतमाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने सोमवारी (दि. 12) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही. तसेच माहेराहून पाच लाख रुपये घेऊन यावेत, या कारणासाठी विवाहितेचा छळ केला. रोख रक्‍कम आणि स्त्रीधन फिर्यादी यांच्याकडून घेऊन शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच शाररीक व मानसिक छळ केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.