“तुमचे तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे थांबवा”

0
392

मुंबई, दि.१७(पीसीबी) – तुमचे तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे थांबवा, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जागतिक आरोग्य संघटना तसंच आरोग्यावर भाष्य करणाऱ्या विविध संख्या संघटनांवर आक्षेप घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटना तसंच आरोग्यावर भाष्य करणाऱ्या विविध संख्या संघटना ह्या कोरोनाच्या काळात विविध आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत. तसंच अहवाल सादर करून अनेक इशारे देखील देत आहेत. या आकड्यांमुळे सामान्य माणसावर परिणाम होऊन तो घाबरून जातो आहे. तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे आता थांबवा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

आजच्या सामनामधून जागतिक आरोग्य संघटनेवर तसंच युनिसेफ आणि विविध संघटनांच्या आकडेवारीवर तसंच अहवालावर संजय राऊत यांनी ताशेरे ओढले आहेत. निष्कर्ष जनतेच्या प्रबोधनासाठी जाहीर होतात हे गृहीत धरले तरी सध्याचे कोरोना हे ‘न भूतो’ असे संकट आहे. त्याला सामान्य माणूस प्रथमच तोंड देत आहे. त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करणारे आणि कोरोना संसर्गापेक्षा भीतीचा प्रादुर्भावच समाजात फैलावणारे ‘तज्ञ’ अहवाल आता आवरा, असं ते म्हणाले.