डुडुळगावातील जंगलात मायलेकाची कीटकनाशक पिऊन आत्महत्या

0
1150

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – मायलेकाने कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि.२६) आळंदी जवळील डुडुळगावातील जंगलातून समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोघांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृत मायलेकाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मात्र त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये, “मी आणि माझी आई स्वखुशीने आत्महत्या करत आहोत”, असे लिहिलेल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आळंदी जवळील डुडुळगावातील जंगलात दोन मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर दिघी पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली असता, तेथे एक स्त्री आणि पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्या ठिकाणची पाहणी केली असता त्या ठिकाणी रोगर कीटकनाशक बाटल्या आणि सुसाईड नोट सापडली त्यामध्ये, “मी आणि माझी आई स्वखुशीने आत्महत्या करत आहोत”, याबाबत कोणाला जबाबदार धरु नये”, असे लिहिलेल आढळून आले. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र न आढळल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.