तिहेरी तलाक विधेयक मंजूर होऊन देखील तलाकची प्रथा सुरुच

0
410

अहमदाबाद, दि. ३१ (पीसीबी) – तिहेरी तलाक विधेयक मंजूर होऊन देखील आज (बुधवार) एका मुस्लीम महिलेवा तिच्या नवऱ्याने तिहेरी तलाक दिला म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ही महिला बचावली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना अहमदाबादमध्ये घडली.

याप्रकरणी महिलेने नवरा आणि सासू-सासऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तिच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत.

राज्यसभेत कालच तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. यापुढे मुस्लीम समाजात पतीने पत्नीला तिहेरी तलाक देणे कायद्याने गुन्हा आहे. पतीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तर त्याला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. राज्यसभेत मंगळवारी मंजूर झालेल्या या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. त्यानंतर पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. मात्र विधेयक मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीत तिहेरी तलाकची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.