तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता…?

0
462

उस्मानाबाद, दि.११ (पीसीबी) – उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत भाजपाला मदत केली होती. ही बंडखोरी आता त्यांना भोवण्याची चिन्ह आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर पक्षविरोधी करवाईचा ठपका ठेवत सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यांच्या भेटीत काय निर्णय होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाईचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता पुरूषोत्तम बर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.