…तर सोनिया गांधींचे राजीव गांधींशी लग्न झाले नसते

0
525

नवी दिल्ली, दि.१ (पीसीबी) – गांधी-नेहरू कुटुंबाचे  प्रसिध्द अभिनेते राज कपूर यांच्या कुटुंबाशी अगदी  निकटचे  संबंध होते. त्यामुळेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची राज कपूर यांच्या मुलीला घरात सून करून घेण्याची इच्छा होती.  मात्र, तसे झाले असते, तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या गांधी घराण्याच्या सून झाल्या नसत्या, असा गौप्यस्फोट  ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या ‘नेता-अभिनेता: बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात करण्यात आला आहे.  

इंदिरा गांधी यांची राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतू हिच्याशी राजीव गांधी यांचा विवाह लावून  देण्याची इच्छा  होती, असे या पुस्तकात म्हटले आहे.  इंदिरा गांधी यांना  राज कपूर यांच्याविषयी मोठा आदर होता. त्यामुळेच त्यांना कपूर घराण्याशी कौटुंबिक संबंध जोडायचे  होते. मात्र, त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. कारण राजीव गांधी यांनी ब्रिटनमध्ये सोनियांबरोबर  लग्न केले होते,  असे या पुस्तकात  नमूद केले आहे. दरम्यान च्या काळात राज कपूर यांची नात करिना कपूरनेही २००२ मध्ये राहुल गांधी तिला आवडत असल्याचे म्हटले होते.  तर राहुल सुद्धा करिनाचा आलेला प्रत्येक चित्रपट पाहायचे,  असेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, एका शोमध्ये करिनाला  तुला कुणाशी डेटींग करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता.  तेव्हा करिनाने राहुल यांच्याबरोबर डेटला जायला आवडेल, असे म्हटले होते.  मात्र २००९ मध्ये करिनाने हे  विधान मागे घेत  ‘ती खूप जुनी गोष्ट झाली आहे. आमच्या दोघांची आडनाव प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच मी असे म्हटले होते. मात्र, कधी तरी त्यांचा पाहुणाचार करायला आवडेल. ते पंतप्रधान झालेले मला  बघायला  आवडेल, पण त्यांच्याशी मी डेट करणार नाही’, असा  तिने स्पष्ट केले होते.