… तर कोरोना काळातील ४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघड करेल – भाजप आमदाराचा इशारा

0
218

बेंगळुरू, दि. २८ (पीसीबी) – भाजपचे असंतुष्ट आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी मंगळवारी थेट पक्षश्रेष्ठीना इशारा दिला आहे. जर त्यांची पक्षातून निलंबन करण्यात आले तर ते कोरोना महामारीच्या काळात कर्नाटकातील बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केलेल्या तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघड करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना झालेल्या अनियमिततेबद्दल यत्नल यांचे आरोप हे भाजपच्या राजवटीत राज्यात ४० टक्के कमिशनचे सरकार असल्याच्या आरोपांचा पुरावा आहे.

यत्नल म्हणाले, “कर्नाटकमधील भाजप सरकारने कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी मला नोटीस देऊन पक्षातून निलंबित करण्याचा प्रयत्न केल्यास, मी त्यांचा पर्दाफाश करेन. यत्नल यांनी येडियुरप्पा व त्यांच्या कुटुंबियांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. येडीयुरप्पा त्यांचा दुसरा मुलगा बी वाय विजयेंद्र यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवल्यानंतर. ते म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात कोरोना व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला.

भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल म्हणाले, ४५ रुपयांचा मास्क खरेदी करतांना दुप्पट किमतीने खरेदी करण्यात आला. एक मास्क खरेदी करण्यासाठी ४८५ रुपये खर्च करण्यात आले होते. भाजप सरकारने बेंगळुरूमध्ये १० हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारले होते. या साठी बेड भाड्याने घेण्यात आले होते. मात्र, जर ते विकत घेतले असते तर भाड्याने घेतलेल्या एका खाटेच्या किमतीत दोन बेड आले असते. जर प्रतिदिन २० हजार रुपये खर्च करण्या पेक्षा सलाईन स्टँड असलेल्या दोन खाटा विकत घेता आल्या असत्या असे देखील भाजप यत्नल म्हणाले.