डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी

3637

१४ एप्रिल हा दिवस देशातील सव्वाशे कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या निमित्ताने जनतेचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते. यावेळी मोदींनी बिजापूरच्या मागासलेपणाला आधीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारविरोधात दलित संघटनांनी २ एप्रिलला भारत बंद पुकारला होता. या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७व्या जयंती निमित्त आयुष्यमान भारत योजनेचे उद्घाटन करत मोदींनी नाराज दलित समाजात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले.