डॉ.अमोल कोल्हेंना केवळ बघायला लोक येत आहेत – गिरीश महाजन

0
527

जळगाव, दि. २४ (पीसीबी) – भाजपची  यात्रा बघून विरोधकही यात्रा काढत आहे.  परंतु जनता या नेत्यांचे तोंड पहायला येत नाही. नवीन निवडून आलेले खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना घेवून ते फिरत आहेत. छत्रपती संभाजी मालिकेत त्यांनी काम केले आहे, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी  येत आहे, अशी टीका  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीवर केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (शनिवार)  जळगाव जिल्ह्यात  दाखल झाली. यावेळी सागर पार्क मैदानावर आयोजित  जाहीर सभेत महाजन  बोलत होते.

महाजन म्हणाले की, काँग्रेस तर व्हेंटीलेटवरच आहे. त्यामुळे यापूर्वी आपण आघाडीला  ४० जागा मिळणार असे सांगितले होते. मात्र आता त्यात घसरण झाली असून त्यांना ३० जागाही मोठ्या मुश्किलीने  मिळतील.  आमच्या सरकारचे काम दमदार  असल्याने विधानसभेत आम्हीच पुन्हा विजयी होऊ, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.