एकनाथ खडसेंना मंत्रिपद देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

0
398

जळगाव, दि. २४ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात  घ्यायचे की केंद्राच्या मंत्रिमंडळात घ्यायचे याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भुसावळ येथे आज (शनिवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे, भोसरी येथील भूखंड प्रकरणी आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  त्यानंतर त्यांना  ‘क्लिन चिट’ मिळाली होती. परंतु खडसे यांचा राज्याच्या मंत्री मंडळात  घेण्यात आलेले नाही.  तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर  खडसे यांनी मंत्रीपद देणार का? असा प्रश्न पत्रकरांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

महाजनादेश यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे.  भुसावळ येथे मुख्यमंत्री  यांनी हॉटेल राधाकृष्ण येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.  दरम्यान, खडसे यांनी महाजनादेश यात्रेत सहभाग घेतला नव्हता. यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.