आम्ही एक चतुर संसदपटू, उत्साही वाचक आणि एक दयाळू नेता गमावला – शरद पवार

0
427

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी १२ वाजता दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनामुळे शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘भाजपाचे दिग्गज नेते श्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मनापासून दु: खी झाले आहे. आम्ही एक चतुर संसदपटू, उत्साही वाचक आणि एक दयाळू नेता गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांचा आत्म्याला शांती लाभो असे शरद पवार यांनी म्हटले आहे.