डुडुळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; आरोपीला अटक

0
2193

दिघी, दि. २ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.१) घडली.

प्रदिप शांताराम तळेकर (वय ३१, रा. डुडुळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सिताराम विठ्ठोबा वहिले (वय ४८, रा. शिवराजनगर, डुडुळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदिप आणि आरोपी सिताराम हे एकमेकांच्या ओळखीचे होते. काही दिवसांपूर्वी त्याच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. याचा राग मनात धरुन सिताराम याने गुरुवारी प्रदिप याच्या डोक्या फरशी घालून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आरोपी प्रदिप फरार झाला होता. आज प्रदिप घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.