डुडुळगावफाटा येथे भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
495

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – भरधाव कारने एका पादचाऱ्याला दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना आळंदी मोशी रस्त्यावर डुडुळगाव फाटा येथे घडली.

प्रल्हाद अश्रोभा मायंदळे (वय ३६) असे मयत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार डी.व्ही बोराडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारचालक विजय वसंत तुपे (रा. दत्तनगर अष्टविनायक कॉलनी, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.१८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रल्हाद मायंदळे हे आळंदी मोशी रस्त्यावरील डुडुळगाव फाटा येथून पायी चालले होते. यावेळी आरोपी विजय तुपे यांनी त्यांच्या ताब्यातील आय १० कार भरधाव वेगाने चालवून प्रल्हाद यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रल्हाद यांचा मृत्यू झाला. कारचालक विजय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.