लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर

0
762

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी  यादी शनिवारी मध्यरात्री जाहीर  केली . या यादीत कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील ३८ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना  नांदेड मतदार संघातून पुन्हा उमेदवारी  दिली आहे.  या यादीत मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्ग्यातून तर दिग्विजय सिंह भोपाळमधून  उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील दुसरे खासदार राजीव सातव हे गुजरातमधील जबाबदारीमुळे  त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. रत्नागिरीचा उमेदवार बदलला जाणार नसला तरी चंद्रपूरवरून झालेल्या वादामुळे पक्षात फेरफार होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात  परतण्याचे वेध लागल्यानेच नांदेडमध्ये पत्नीचे नाव लोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढे केले होते. मात्र,  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळून  लावत अशोक चव्हाणांनाच  लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

काँग्रेसची उमेदवार यादी

नंदुरबार – के. सी. पडवी

धुळे – कुणाल रोहिदास पाटील

वर्धा – चारुलता टोकस

मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड

यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे

शिर्डी- भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर

नागपूर – नाना पटोले

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे

मुंबई उत्तर-मध्य – प्रिया दत्त

मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा

गडचिरोली-चिमूर – डॉ. नामदेव उसेंडी

चंद्रपूर- विनायक बांगडे

जालना- विलास औताडे

औरंगाबाद- सुभाष झांबड

भिवंडी – सुरेश टावरे

लातूर- मच्छिंद्र कामनात

नांदेड- अशोक चव्हाण